Friday, 18 October 2013

कोटेबल कोट्स

कोटेबल कोट्स
-
1. जे शब्द तुम्ही सातत्याने निवडता, तेच शब्द तुमचे भाग्य ठरवितात.  - ऍन्थनी रॉबिन्स

2.
प्रत्येक संकटात काहीतरी फायदा मिळवून देणारे बीज दडलेले असते. - नेपोलियन हिल

3.
वर्तमानाच्या उदरात भविष्यकाळ वाढत असतो.  - व्होल्टायर

4.
तुमचे काम जर बोलत असेल, तर तुम्ही वेगळे बोलण्याची गरज नसते. - हेन्‍री जे. केसर

5.
आपण एकावेळी सर्व गोष्टी करू शकत नाही; पण आपण एकावेळी एखादी गोष्ट नक्‍कीच करू शकतो.  - केल्व्हिन कोलिज

7.
भीतीचा अंत तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा भीती वाटणारी गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाईल.
-
राल्फ वाल्डो इमर्सन

8.
एखादी समस्याच आपल्यावर जय मिळविते असे कधीही घडायला नको.
-
ए.पी.जे. अब्दुल कलाम

9.
शांततेची सुरवात ही हसण्यातूनच होते.   - मदर तेरेसा

भीती वाटणाऱ्या गोष्टींना समजून घेतले, की त्याबद्दल भीती राहात नाही.  -मेरी क्‍यूरी