Wednesday, 13 November 2013

इन्स्टन्ट पु.ल

      


  • आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.    पु.


  • साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु. लं. ना आवर्जून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक चालू असतांनाच पडद्यामागे धडाम्कन्काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु. लं. ना म्हणाला, 'काय पडलं हो?''नाटऽऽक दुसरं काय?' पु. लं. उत्तरले.


No comments:

Post a Comment